छद्दन्द जातककथा

भरहुत स्तुपावर छद्दन्द जातककथेचे शिल्प आहे ..ही एक प्रसिध्द जातककथा असल्यामुळे ह्यावर अजिंठा लेणीतही खुप सुंदर चित्र निर्माण झालेले आहे ..
ह्या जातककथेतून गैरसमज – मत्सरातुन निर्माण झालेल्या द्वेशाचे परिणाम सर्व कुटुंबाला कसे हानीकारक असतात ..हे समाज मनावर ठसवण्यात आले आहे ..
जातककथेमध्ये पशू – पक्षी त्यांचे जीवन…, मृत्यु , पुनर्जन्म .., पुर्वजन्माच्या स्मृती दिसून येतात ..त्या बाबी कथाभाग म्हणून घ्यायच्या असतात …तो इतिहास म्हणून स्विकारायचा नसतो ..!
हिमालयात सफेद ( शुभ्र ) हत्तींचा एक कळप त्या कळपाचे नेता छद्दन्द हत्ती असतो ..त्याला दोन हत्तीणी राण्या असतात एक महासुभद्दा तर दुसरी चुल्लसुभद्दा असते ..त्यांची अनेक नातेवाईक त्या कळपात असतात ..त्यांचा नेता छद्दन्द हा असतो ..छद्दन्द नुसताच शुभ्र वर्णाचा असतो असे नसते तर त्याचे मुख सर्वात सुंदर तेजस्वी असते .,शिवाय त्याला सहा मजबुत दांत ( सूळे ) असतात ..
एके दिवशी हा कळप तळ्यात जलक्रिडेसाठी येतो ..मनसोक्त जलक्रीडा झाल्यावर तळ्याच्या काठांवरील शालवृक्षाच्या सावलीत कपळ विसावतो ..
शालवृक्ष हा फुलांनी डवरलेला असतो ..त्याफुलांचा सुगंध सर्वांना मोहीत करीत असतो ..
तेव्हढ्यात छद्दन्द हत्तीला एक कल्पना सुचते ..
त्याने वर सोंड करुन फुलांनी बहरलेली एक फांदी धरली आणी ते झाड गदगदा हलवीले ..
वाऱ्याच्या झोताममुळे सर्व फुली खाली पडली ती नेमकी महासुभद्दा राणीवरच पडली ..चुल्लसुभद्दा राणीवर वृक्षाची वाळलेली फांदी पडली ..हे पाहून चुल्लसुभद्दा राणीला गैरसमज झाला ..आणी तिचा मत्सर उफाळून आला ..ती रागाने कळप सोडून निघून गेली ..तीचा शोध घेतल्यावरही ती कुणालाच दिसली नाही ..रागाच्या बेफाम अवस्थेत तीचा पर्वतावरून कडेलोट झाला आणी ती गतप्राण झाली ..तीचा ताबडतोब पुनर्जन्म झाला ..ती एक सुंदर कन्या झाली ..कालांतराने ती एका राजाची राणी झाली ..पण तीला मागच्या जन्माची स्मृती कायम असते ..छद्दन्द हत्तीला अद्दल घडवावी म्हणून ती राजाला आपली इच्छा सांगते ..की , ” मला छद्दन्द हत्तीचे सूळे हवे आहेत ..त्या सुळ्यांच्या फणीनेच मला केस विंचरायचे आहेत ” !
राजाने सैनिकांना आदेश दिला ..
सैनिक जंगलात त्या कळपाच्या मागे लागले ..सर्व कळपाचा नाश होईल असे वाटून तो छद्दन्द हत्ती सैनिकांना बोलला ..” तुम्हाला काय हवे ते मला सांगा ..माझ्यामुळे माझ्या इतर नातेवाईक आणी प्रजेला विनाकारण त्रास होऊ नये ..अशी माझी इच्छा आहे ” !
” आम्हाला तुझे हस्तिदंत हवे आहेत “!
हे ऐकल्यावर छद्दन्द हत्तीने आपले सूळे स्वताःहून तोडून दिले ..
सैनिकांनी त्वरेने ते हस्तीदंत राजाला दिले ..आणी हास्तिदंत प्राप्तीची हकीकतही सांगितली ..ते ऐकुन राजाला नवल वाटले ..तो हत्ती विषयी विचार करू लागला ..नक्कीच हा हत्ती बोधिसत्व असावा असा विचार त्याच्या मनात निर्माण झाला ..
त्याला बघण्यासाठी तो त्वरेने जंगलात निघाला ..
इकडे छद्दन्द अती वेदनेने गतप्राण झाला होता ..हे समजून आल्यावर त्या राणीला पश्चाताप होतो आणी ती देखील गार्तेत पडून मृत्युमुखी पडते ..
मत्सर – द्वेश मनात ठेवल्यावर काय घडते ..याची जाणीव व्हावी म्हणून ही कथा निर्माण झालेली आहे ..

Leave a comment