हत्ती स्फिंक्स /बुध्दगया —व्हिक्टोरिया अँन्ड अल्बर्ट म्युझियम लंडन

लंडन येथील व्हिक्टोरिया अँन्ड अल्बर्ट म्युझियम मध्ये भारतातील बुध्दिस्ट संस्कृतीचे प्रेरणास्थान असलेल्या ” बुध्दगया ” येथील उत्खननात आढळलेल्या पाषाणी स्तंभावरील हे ” हत्ती ” चे स्फिंक्स आहे …..

या स्तंभाचा काळ हा कुषाण काळ असुन इसवी सन एक ते शंभर आहे …..

प्राचीन बुध्दिस्ट संस्कृतीमध्ये प्राण्यांना पंख शिल्पकलेमध्ये दर्शविणे यावर ग्रिक शिल्पकलेच्या प्रभावातुन आले …

महाराष्टातील औरंगाबाद जिल्हयातील ” पितळखोरा ” हया बुध्दिस्ट लेणीमध्ये असे अनेक प्राण्यांचे स्फिंक्स दर्शविलेले आहेत …..

शिल्पकलेमध्ये प्राण्यांना पंख दर्शविले तर पुरातत्वीय भाषेत त्यांना मराठीत ” व्याल ” आणि इंग्रजी मध्ये ” स्फिंक्स ” असे म्हटल्या जाते …..

बुध्दगया येथील उत्खननामध्ये आढळलेल्या कुषाण काळातील हया हत्ती स्फिंकच्या सभोवताल आजच्या प्रमाणे कमळाची फोटो फ्रेमिंग प्राचीन शिल्पकलेमध्ये केलेली आहे …

शिल्पकलेमध्ये हत्तीची पोजिशन ही सिरीलंकेतील राष्टीय ध्वजावरील हत्ती सारखीच आपल्याला दिसुन येत आहे …

हत्ती आणि कमळ हे दोन्ही प्रतीके प्राचीन बुध्दिस्ट संस्कृतीमध्ये सिध्दार्थ गौतमांचे ” जन्म प्रतीक ” आहे ….!

गोपीचंद कांबळे, यवतमाळ

Leave a comment